‘माझ्या हातात तुजोरी आहे म्हणून लुटमार करायची, याला लूटमार म्हणतात’; निधी वाटपावरून राऊत यांचा जहरी टीका

‘माझ्या हातात तुजोरी आहे म्हणून लुटमार करायची, याला लूटमार म्हणतात’; निधी वाटपावरून राऊत यांचा जहरी टीका

| Updated on: Jul 24, 2023 | 11:46 AM

तर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनाही निधी देत त्यांची असणारी नाराजी दुर करण्याचा प्रययत्न केला आहे. तर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना 150 कोटींचा निधी दिला.

मुंबई , 24 जुलै 2023 | अजित पवार यांनी अर्थमंत्रालय आपल्याकडे घेताच मोठा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे आणि गटाला सपोर्ट करणाऱ्या आमदारंच्या निधीत भरघोस वाढ केली. तर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनाही निधी देत त्यांची असणारी नाराजी दुर करण्याचा प्रययत्न केला आहे. तर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना 150 कोटींचा निधी दिला. मात्र शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांना लागणार विकास निधी दिला नाही. त्यावरून आता जोरदार टीका होत आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, अजित पवार यांच्यावर बोट ठेवले आहे. त्यांनी माझ्या हातात तुजोरी आहे म्हणून लुटमार करायची, याला लूटमार म्हणतात असा घणाघात केला आहे. तर निधी वाटपावरून गंभीर आरोप केले आहेत. तर निधी वाटप म्हणजे एक संशोधनाचा विषय झाला झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Published on: Jul 24, 2023 11:46 AM