मुख्यमंत्री शिंदे यांची रजा आणि काश्मीर दौऱ्यावर राऊतांची खरमरीत टीका; म्हणाले, ‘बर्फाची मजा वेगळीच, डोकं शांत’
एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपबरोबर जात सत्ता स्थापन केली. ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहेत. याचदरम्यान ते गुरूवारी तीन दिवस रजेवर गेल्याचं स्पष्ट झाले.
मुंबई : राज्यात गेल्यावर्षी बंडाळी करत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी राज्यात भाजपबरोबर जात सत्ता स्थापन केली. ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहेत. याचदरम्यान ते गुरूवारी तीन दिवस रजेवर गेल्याचं स्पष्ट झाले. ते जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेले असून त्यांनी सहकुटुंब वैष्णो देवीचं दर्शन घेतलं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाना साधत टीका केली आहे. त्यांनी, शिंदे हे कुटुंबासह गेलेत. बर्फ पडत आहे. बर्फाची मजा काही वेगळीच असते. इकडे उन्हाळा आहे, डोकं शांत करायला ते गेले असतील. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे स्फोट होणार आहेत आणि त्या संदर्भात अमित शाह यांनी त्यांना जे आदेश दिले आहेत, मंत्रिमंडळ बदलाचे आणि काही मंत्र्यांना वगळण्याचे ते ओझं घेऊन ते कश्मीरला गेले असतील असा टोला राऊत यांनी लगावला आहे.