म्हस्केंच्या आरोपांवर अजित पवारांच एका वाक्यात उत्तर; म्हणाले, असल्या आलतू फालतू...

म्हस्केंच्या आरोपांवर अजित पवारांच एका वाक्यात उत्तर; म्हणाले, असल्या आलतू फालतू…

| Updated on: Mar 31, 2023 | 2:47 PM

रोहित पवार यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पाडा असे फोन अजित पवार यांनी लावले असा अरोप म्हस्के यांनी केला होता. या आरोपावर अजित पवार यांनी एका वाक्यातच उत्तर देत कोण म्हस्के, मी त्यांना ओळखत नाही, असे म्हटलं आहे

मुंबई : ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर रोहित पवारांवरून टीका केली. तसेच रोहित पवार यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पाडा असे फोन अजित पवार यांनी लावले असा अरोप केला होता. या आरोपावर अजित पवार यांनी एका वाक्यातच उत्तर देत कोण म्हस्के, मी त्यांना ओळखत नाही, असे म्हटलं आहे. तर असल्या आलतू फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही असाही टोला म्हस्के यांना लगावला आहे. आम्ही घरामध्ये अशा पद्धतीने कधीच वागत नाही. तर आपल्याकडून असे घडणार नाही. तो माझा पुतण्या आहे, माझा मुलगा असल्या सारखा असल्याचेही अजित पवारांनी म्हटलं आहे.

 

Published on: Mar 31, 2023 02:47 PM