ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्क इमारतीला आग; पाहा व्हीडिओ…
ठाण्यातील सिने वंडर मॉलजवळच्या ओरियन बिझनेस पार्क इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. पाहा व्हीडिओ...
ठाणे : ठाण्यातील सिने वंडर मॉल आणि ओरियन बिझनेस पार्क, कापूरबावडी, घोडबंदर रोड, ठाणे येथील ओरियन बिझनेस पार्क इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. तळ मजला ते पाचव्या मजल्यापर्यंत ही आग लागलेली आहे. 80 ते 90 ऑफीस गाळ्यांना आग लागली आहे. घटनास्थळी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल पोहोचले. फायर ब्रिगेडची 5 वाहन, रेस्क्यू वाहन 2, वॉटर टँकर 5 आणि जम्बो वॉटर टँकर 2 वाहन घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी ओरियन बिझनेस पार्क मधील पझल पार्किंग मधील 8 ते 9 वाहनांना आग लागली आहे. घटनास्थळी लागलेली आग आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.आगीचे कारण अजून अस्पष्ट असून या आगीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माहिती नुसार कोणतीही जीवितहानी आलेली नाही.