50 खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया?; जितेंद्र आव्हाड यांचा गाण्यातून शिवसेनेला सवाल
Thane News : 50 खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया?; गाणं गात जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला सवाल. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गाण्याच्या माध्यमातून शिवसेनेला प्रश्न विचारला आहे. “पचास खोका तुमने खाया, महाराष्ट्रने क्या पाया? पचास खोका… लडके ने गाके अपने जबान पे लाया… तो पुलीसने उसको जेल दिखाया अरे पचास खोका… अब कौन डरता है तेरे नाम से अलीबाबा के चालीस चोरो से, पचास खोका… पचास खोके का नाम लेते ही तुम क्यू चिडते हो अपना रिश्ता उससे क्यू जोडतो हो?”, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला प्रश्न विचारला आहे. आता ही अशी तुमची ओळख झालेली आहे, पचास खोका! त्यापासून तुम्ही लांब पळू शकत नाही. उद्धव ठाकरे यांना घरात बंद करणारा माणूस या पृथ्वीतला वरती जन्माला यायचं आहे. आधी मी ठाकरेंचा मोठा विरोधक होतो. पण आजही माझं म्हणणं आहे ठाकरे हे नाव ठाकरे आहे. ठाकरे नाव एक ब्रँड आहे. आजही त्यांनी मराठी मनावरती नाव नोंदवून ठेवलेलं आहे. ठाकरेंवर प्रेम करणारा शंभर टक्के माणूस हा मराठी आहे, असंही आव्हाड म्हणाले आहेत.