ठाण्यात गुंडांना सहारा दिला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

ठाण्यात गुंडांना सहारा दिला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

| Updated on: Apr 05, 2023 | 8:21 AM

Jitendra Awhad on CM Eknath Shinde : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “ठाण्यात ही कोणती हुकूमशाही आहे? ठाण्यात गुंडांना सहारा दिला जातोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचीच बाजू घेत आहेत. माझ्या कुटुंबाविषयी कट करणाऱ्याला हेच लोक मदत करत असतात. कोणाच्या आशीर्वादाने आयुक्त त्या ठिकाणी बसलेला आहे? मी भेटल्यानंतर मुख्यमंत्री मला नेहमी सांगत असतात, जितेंद्र तुझ्यावरती लक्ष आहे. मागे देखील माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला तेव्हा देवेंद्रजी यांनी गुन्हा दाखल केला आहे असं या ठिकाणी ते बोलले. ते या प्रकरणात मी काही करत नाही आपण मित्र आहोत तेच फक्त बोलत असतात, असं सांगितलं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Published on: Apr 05, 2023 08:21 AM