Thane potholes Blocking | खड्डे बुजवा अन्यथा खड्यातच जलसमाधी, सामाजिक कार्यकर्त्यांची गांधीगिरी, स्वतः खड्डे बुजवत अनोखे आंदोलन

Thane potholes Blocking | खड्डे बुजवा अन्यथा खड्यातच जलसमाधी, सामाजिक कार्यकर्त्यांची गांधीगिरी, स्वतः खड्डे बुजवत अनोखे आंदोलन

| Updated on: Jul 18, 2022 | 5:02 PM

Thane potholes Blocking Movement | प्रशासनाला जागे करण्यासाठी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधीगिरी केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

Thane potholes Gandhigiri | राज्यात कोसळधार पावसामुळे (Heavy Rain) रस्त्याचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. ठाण्यातील अनेक रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे (potholes on Road) अशा अवस्थेमुळे वाहनधारकांना (Driver) आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे. तर घोडबंदर, नाशिक रोड या रस्त्यावर खड्डे पडल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहन कोंडी होत आहे. या परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील साकेत पुलावर सामाजिक कार्यकर्ते (Social Worker) संगम डोंगरे यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांनी सहकाऱ्यांसह खडे बुजवण्यासाठी अनोखे गांधीगिरी केली. त्यांनी हे खड्डे बुजवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही पालिका प्रशासन तकलादू भूमिका घेत संथपणे रस्ते बुजवण्याचे काम करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांनी त्यांचाशी बातचीत केली.