Thane Welding Company Fire | ठाण्यातील वागळे इस्टेटमधील वेल्डिंग कंपनीमध्ये भीषण आग
आगीची तीव्रता लक्षात आल्यानंतर त्यांनी तब्बल एक-दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविले आहेत. सध्या फायर कुलिंगचे काम सुरू आहे.
ठाणे – ठाणेच्या (Thane) वागळे इस्टेट (Wagle Estate) मध्ये असलेल्या अंबिका नगर 2 मध्ये रात्री 10 च्या सुमारास एका वेल्डिंग कंपनीमध्ये मोठी आग लागली.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या, वागळे पोलिस स्टेशनचे (Police) कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात आल्यानंतर त्यांनी तब्बल एक-दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविले आहेत. सध्या फायर कुलिंगचे काम सुरू आहे. तसेच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेत आहेत.
Latest Videos