‘ती अदृश्य शक्ती म्हणते तू मला सोडून गेलास तर…’. आशिष शेलार यांचा कुणावर निशाणा?
खासदार विनायक राऊत यांच्याकडे मराठा समाजाच्या सभेत गोंधळ घालण्याचा डाव होता अशी काही माहिती असेल तर त्यांनी तसे पुरावे पोलिसांना द्यावेत. जनता त्यांचा माज उतरवत आहे. ठाकरे गटामध्ये नाराजी असायला त्यांच्याकडे असे पदाधिकारी आहेतच किती? असा टोला त्यांनी लगावला.
मुंबई : 17 ऑक्टोबर 2023 | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून अजित पवार यांना घेरलंय तर सहकारी पक्षाचे नेते त्यांच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावर भाष्य करताना ठाकरे गटावर टीका केलीय. मीरा बोरवणकर यांचं पुस्तक मी वाचलेलं नाही. त्यामुळे अधिकृत प्रतिक्रिया मी देणार नाही. पण, मला एक जाणवतय की अजितदादा आमच्यासोबत सत्तेत आले. ज्या काही घटना घडतायत ते पाहता एक अदृश्य शक्ती सांगू पाहते की ‘तू मला सोडून गेलास मी तुला सोडणार नाही’ असा काहीसा वास येतोय असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.
Published on: Oct 17, 2023 11:12 PM
Latest Videos