बदलापूरच्या तरुणाची 'ती' एक कृती आदर्श ठरली, परदेशात भारतीयांची मान उंचावली

बदलापूरच्या तरुणाची ‘ती’ एक कृती आदर्श ठरली, परदेशात भारतीयांची मान उंचावली

| Updated on: Oct 01, 2023 | 7:06 PM

बदलापूरच्या महेश त्रिमुखे याने या पदवी ग्रहण समारंभात त्याने जे काही केलं ते पाहून भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला. त्याचा VIDIO सोशल माध्यमावर व्हायरल होतोय.

बदलापूर : 1 ऑक्टोबर 2023 | बदलापूरचा महेश त्रिमुखे हा विद्यार्थी ब्रिटनमध्ये शिकत होता. तेथे त्याने मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेसची पदवी त्याने मिळविली. पदवी ग्रहण समारंभाचा कार्यक्रम होता. यावेळी त्याने जी कृती केली त्याचा VIDIO खूपच व्हायरल झालाय. पदवी ग्रहण समारंभातही तो मायदेशाला विसरला नाही हे विशेष. पदवी ग्रहण समारंभात महेश नारायण त्रिमुखे नावाचा उल्लेख झाला. महेश पदवी ग्रहण करण्यासाठी मंचावर गेला. त्याचवेळी त्याने आपल्या खिशातून सांभाळून भारताचा तिरंगा बाहेर काढला आणि व्यासपीठावरच डौलाने फडकवला. आपल्या मायदेशाप्रती असलेलं प्रेम महेशने अशा प्रकारे व्यक्त केलं. महेश याच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होतंय. महेश जिथे शिकला त्या सेंट अँथनी कॉन्व्हेन्ट शाळेत त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा जाहीर सत्कार करण्यात आला.

Published on: Oct 01, 2023 06:06 PM