Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरे यांचे ते कागद… जिथे पोहोचवाचे तिथे…’, नारायण राणे यांचा इशारा
मातोश्रीवरचे सरंक्षण काढा बेशुद्ध पडेल. शेतातल्या बुजगावणे सारखा उद्धव ठाकरे दिसतो. शरद पवार यांनी आत्मचरित्र्यात खूप लिहून ठेवलेलं आहे. उद्धव ठाकरेची भेट मिळणं किती कठिण होते हे लिहून ठेवलं आहे. शरद पवारांनी यांच्यावर टीका केलेली आहे.
मुंबई : 14 सप्टेंबर 2023 | ‘उद्धव ठाकरे यांची लंडनमधील काही कागद माझ्याकडे आहेत. जिथे पोहोचवाचे तिथे ते पोहोचवले आहेत असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. उद्धव ठाकरे कधी कुणाच्या कार्याला कधीच गेले नाही. ठाकरे नावाला हा कलंक आहे. हिंदू धर्माचे रक्षण व्हायला पाहिजे म्हणून बाळासाहेबांनी काम केले आणि यांनी काय केले. पक्षप्रमुख आणि स्वतःचे नाव? देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे फिरतो. प्रोटेक्शन सोडून दे. सत्ता गेली म्हणून असे शब्द तोंडून येतात. बाळासाहेब लढले, झगडले. पण त्यांनी कधी तडजोड केली नाही. पण, यांनी मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वासोबत गद्दारी केली अशी टीका राणे यांनी केली. ग्रॅड ह्यातच्या बैठकीत वाँचमन म्हणून चांगले काम केलं. जिथे संजय राऊत बसला तिथे तो पक्ष संपवण्यासाठी काम करतो. विशेष अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे जिथे जिथे गेले तिथं जाऊन पंचनामा करणार असा इशारा त्यांनी दिला. तर राज ठाकरे यांना गोवा मुंबई महामार्गावर चांगला रस्ता दिसला नाही का? अधिवेशन संपल्यानंतर मी त्यांना घरी येण्याची विनंती करणार आहे, असेही राणे म्हणाले.