कोल्हापूरचा कार्यकर्ता म्हणतो, ‘रक्ताचे नसलो तरी रक्ताने लिहलेलं प्रतिज्ञा पत्र शरद पवार यांना देणार’

कोल्हापूरचा कार्यकर्ता म्हणतो, ‘रक्ताचे नसलो तरी रक्ताने लिहलेलं प्रतिज्ञा पत्र शरद पवार यांना देणार’

| Updated on: Jul 05, 2023 | 2:25 PM

शरद पवार यांच्या सपोर्टसाठी आता गाव आणि शहर पातळीवरून देखील कार्यकर्ते मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या बाहेर पोहचत आहेत. यातीलच काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सपोर्ट देताना अजित पवार यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना सवाल केला आहे.

मुंबई : अजित पवार यांच्या बंडाळीनंतर राज्यभर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता चांगलाच दुखावला आहे. यावेळी शरद पवार यांच्या सपोर्टसाठी आता गाव आणि शहर पातळीवरून देखील कार्यकर्ते मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या बाहेर पोहचत आहेत. यातीलच काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सपोर्ट देताना अजित पवार यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना सवाल केला आहे. तर ज्याने आपल्याला राजकारण शिकवल त्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाण चुकिचं असल्याचं मत एका सामान्य कार्यकर्त्यानं बोलून दाखवलं. तर निधी मिळत नसल्याच्या कारणाने आपण अजित पवार यांच्याबरोबर जात असल्याचं अनेक आमदारांनी बोलून दाखवल्यावर त्यांच्यात धमक होती. त्यांनी फक्त जनतेपर्यंत जात हा प्रश्न मांडायला पाहिजे होता. तर राजीनामा देऊन सरकारविरोधत उभ रहायला हवं होतं असं म्हटलं आहे. तर एका कार्यकर्त्यानं कोल्हापूरी बाना दाखवत, प्रतिज्ञा पत्र हे रक्तानं लिहून शरद पवार यांना देणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला.

Published on: Jul 05, 2023 02:25 PM