रोहित पवार यांना दिलासा, बारामती अॅग्रो लिमिटेडवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती, सुनावणी 11 सप्टेंबरला

रोहित पवार यांना दिलासा, बारामती अॅग्रो लिमिटेडवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती, सुनावणी 11 सप्टेंबरला

| Updated on: Jul 30, 2023 | 11:39 AM

बारामती अॅग्रो लिमिटेड या साखर कारखानाविरोधात असणारा गुन्हा आणि कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती गेल्या आठवड्यात देण्यात आली होती. तर बारामती अॅग्रोने आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता.

मुंबई, 30 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी दिलासा दायक बातमी आहे. त्यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड या साखर कारखानाविरोधात असणारा गुन्हा आणि कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती गेल्या आठवड्यात देण्यात आली होती. तर बारामती अॅग्रोने आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता. तर त्याबाबत साखर आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. ज्यानंतर गुन्हा दाखल करण्यासह कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिले होते. त्याविरोधात पवार यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर आता पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Published on: Jul 30, 2023 10:53 AM