गाड्या तर फोडूच पण गद्दाराच्या तोंडालाही काळं फसू, शिवसेनेच्या कोकाटेंचा इशारा

| Updated on: Aug 03, 2022 | 11:36 AM

ज्या लोकांना पायी फिरावे लागत होते त्यांना शिवसेनेच्या कृपेने गाडीत फिरायला मिळत आहे, एका सामान्य माणसाला आमदार बनविले, असे असताना गद्दारी करणाऱ्यांच्या गाड्या तर फोडूच पण शिवसैनिक त्यांच्या तोंडाला काळं फासायलाही मागेपुढे पाहणार नाही असे कोकाटे यावेळी म्हणाले.

काल पुण्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर गाड्या तर फोडूच पण गद्दाराच्या तोंडालाही काळं फासू असा इशारा नांदेडचे शिवसेना प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी दिला आहे. कोकाटे यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लोकांना पायी फिरावे लागत होते त्यांना शिवसेनेच्या कृपेने गाडीत फिरायला मिळत आहे, एका सामान्य माणसाला आमदार बनविले, असे असताना गद्दारी करणाऱ्यांच्या गाड्या तर फोडूच पण शिवसैनिक त्यांच्या तोंडाला काळं फासायलाही मागेपुढे पाहणार नाही असे कोकाटे यावेळी म्हणाले. काल  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक केली आहे. तसंच मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांनादेखील  अटक केली आहे. राजेश पळसकर,चंदन साळुंके,सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Published on: Aug 03, 2022 11:36 AM