Odisha Train Accident | पंतप्रधान मोदी यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांचं टि्वट; म्हणाले, ‘वृत्त क्लेशदायक’
हावडा-शालीमार एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बहनगा स्टेशनजवळ रुळावरून घसरली, यात 233 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक लोक जखमी झाले. कोरोमंडल एक्स्प्रेसची बंगळुरू-हावडा एक्स्प्रेसला टक्कर झाली. खरगपूर डीआरएम यांनी याला दुजोरा दिला आहे.
मुंबई : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. हावडा-शालीमार एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बहनगा स्टेशनजवळ रुळावरून घसरली, यात 233 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक लोक जखमी झाले. कोरोमंडल एक्स्प्रेसची बंगळुरू-हावडा एक्स्प्रेसला टक्कर झाली. खरगपूर डीआरएम यांनी याला दुजोरा दिला आहे. तत्पूर्वी, कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली, त्यामुळे बेंगळुरू हावडा एक्स्प्रेसची टक्कर झाली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे 12 डबे रुळावरून घसरले. या भीषण अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून भाष्य केले आहे. ‘ओडिशातील रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो आहे. शोकाकुल परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. तर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या अपघातावर भाष्य केले आहे. त्यांनी ट्विट करून झालेल्या भीषण दुर्घटनेचे वृत्त क्लेशदायक असल्याचे म्हटलं आहे. तर या अपघातात बळी पडलेल्या दुर्दैवी प्रवाशांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली. हा आघात सहन करण्यासाठी ईश्वराने त्यांच्या आप्तस्वकीयांस बळ द्यावे व जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना.