दहा वर्षात देशाचा माहोल खराब, अजितदादांसमोर मुस्लीम नेते बाबाजानी दुर्रानी यांची खंत

दहा वर्षात देशाचा माहोल खराब, अजितदादांसमोर मुस्लीम नेते बाबाजानी दुर्रानी यांची खंत

| Updated on: Feb 18, 2024 | 10:24 PM

बाबाजानी दुर्रानी परभणीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत. दु्र्रानी विधानसभेचे आमदार देखील होते. ते सध्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार असून पाच महिने त्यांची टर्म शिल्लक आहे. परभणीतील पाथरी नगरपालिकेवर 30 वर्षे दुर्रानींचे वर्चस्व आहे. एकीकडे भाजपाचे नितेश राणे हे सोलापूरात हिंदुंना मुस्लीमांविरोधात जाहीर चिथावणी देत आहेत त्यावर भाजपाचे नेते प्रतिक्रिया देत नाहीत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मुस्लीमांची मते मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे हे सोशल इंजिनिअरींग तर नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे.

नवीमुंबई | 18 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादीत बंडखोरी करुन भाजपात जाणाऱ्या अजित पवार यांनी सर्वांगीन विकासासाठी आपण चाललो असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे नवीमुंबईत राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात पक्षाचे नेते बाबाजानी दुर्रानी यांनी गेल्या दहा वर्षांत देशाचा माहोल खराब करण्याचा जसा प्रयत्न सुरु आहे, त्याने चिंता वाटत असल्याची खंत व्यक्त केली आहे. कॉंग्रेसमधून पूर्वी दोन लोक निवडून यायचे एक औरंगाबादवरुन रफीक झकेरीया, दुसरे नांदेडहून फारुख पाशा. पहिले खूप जास्त यायचे आता कमी येतात ही तक्रार नाही. परंतू गेल्या दहा-पंधरा वर्षात देशाचा माहोल खराब होत असल्याने चिंता आहे. नेहरु आणि शास्रीच्या जमान्यात देशभरातून 36 मुस्लीम खासदार निवडून यायचे आता केवळ 25 मुस्लीम खासदार निवडून येतात असेही बाबाजानी दुर्रानी यांनी म्हटले आहे. आमच्या महायुतीचे मेळावे झाले त्यात जयश्रीराम अशा घोषणा दिल्या. मी त्यांना म्हटले रामाचा आदर आम्ही सुद्धा करतो, आम्ही पाचवी शिक्षकांना रघुपती राघव राजाराम…हे भजन म्हणून दाखवायचो. आमच्या अभ्यासातही रामाची नज्म होती. परंतू आता राजकीय भांडवल केले जात असल्याची टीका त्यांनी केली. आता महायुतीत जेथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तेथे मुस्लीम मतांसाठी काय करावे यासाठी आपण अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी एकट्यात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुमतांचे ध्रुवीकरण करून सत्ता मिळविली जात आहे, परंतू मुस्लीमांनाही सोबत घेतले तर दुधात साखर होईल आणि महाराष्ट्र आणि देशाचा खरा विकास होईल असेही दुर्रानी यांनी म्हटले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपाबरोबर असून मुस्लीम मतदार दुखावू नयेत म्हणून प्रयत्न सुरु केल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Feb 18, 2024 10:22 PM