Ambernath | अंदाधुंद गोळीबार प्रकरण; पंढरीनाथ फडकेला जामीन नाही
पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण 33 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अंबरनाथ : येथील 13 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन गोळीबार झाला होता. त्याप्रकरणी अंदाधुंद गोळीबार प्रकरणी 33 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पंढरीनाथ फडके यांने न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला आहे. पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण 33 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर मोठा दबाव असून, पोलीस संपूर्णपणे एकतर्फी तपास करत असल्याचा आरोप पंढरीनाथ फडके यांच्या वकिलांनी केला आहे.
Published on: Mar 07, 2023 09:29 AM
Latest Videos