दिल्लीवरून निघालेली CRPF महिलांची बाईक रॅली भंडाऱ्यात

| Updated on: Mar 20, 2023 | 9:17 PM

VIDEO | पाच राज्यांमधून प्रवास करत या CRPF महिलांची रॅली आग्रा, ग्वालेर, भोपाळ, नागपूरमार्गे 1,300 किलोमीटरचा प्रवास करून आज भंडाऱ्यात दाखल

भंडारा : महिला सशक्तिकरणाचा जागर करण्यासासोबतच केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलामध्ये (सीआरपीएफ) महिलांचा सहयोग वाढविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने दिल्ली येथून CRPF महिलांची बाईक रॅली निघाली आहे. दरम्यान, दिल्लीवरून निघालेली CRPF महिलांची बाईक रॅली आज भंडारा शहरात दाखल झाली आहे. दिल्ली येथून 9 मार्चपासून या CRPF महिला बाईक रॅलीची सुरूवात झाली होती. या बाईक रॅलीमध्ये 100 महिला सीआरपीएफ कॅडेटचा समावेश आहे. तर पाच राज्यांमधून प्रवास करीत या CRPF महिलांची रॅली आग्रा, ग्वालेर, भोपाळ, नागपूरमार्गे 1,300 किलोमीटरचा प्रवास करून आज सोमवारी भंडारामध्ये पोहोचली आहे. दरम्यान भंडाऱ्यातील पोलीस परेड मैदानावर CRPF महिला दाखल झाल्यानंतर त्यांनी तिथे बाइकर्स प्रात्यक्षिक सादर केले आहे.

Published on: Mar 20, 2023 09:17 PM
…आणि त्यानं थेट पत्नीलाच कडेवर घेतलं, आनंद पोटात मावेना, पाहा VIDEO
अवकाळीनं चारा खराब अन् जनावरांना मोठा फटका; बघा शेतकऱ्यांची वाताहत