Special Report : शिंदे सरकारचा फैसला सुप्रीम कोर्टात
20 जुलैपासून शिवसेनेने आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या चार याचिकांवर सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरवू नका, जैसे थे परिस्थिती ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.
मुंबई : एकनाश शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडानंतर राज्यातील सत्तानाट्याच्या काळात झालेल्या घडामोडींवर आता २० जुलैला सुप्रीम कोर्टात (Supreme Court)सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत होणारी सुनावणी 11 जुलैला होणार होती, मात्र दरम्यानच्या काळात शिवसेनेने आणखी काही याचिका दाखल केल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमना (Chief Justice of India)यांनी या याचिकांच्या सुनावणीसाठी घटनापीठ करावे लागेल असे सांगत सुनावणी पुढे ढकलली होती. आता या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हेमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे. 20 जुलैपासून शिवसेनेने आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या चार याचिकांवर सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरवू नका, जैसे थे परिस्थिती ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.