Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील ‘सहा’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; यात तुमचा ही जिल्हा आहे का?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील ‘सहा’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; यात तुमचा ही जिल्हा आहे का?

| Updated on: Jun 28, 2023 | 11:18 AM

जवळपास जून महिना कोरडा गेल्यानंतर आता वरूण राजा जबरदस्त बँटींग करणार आहे. याबाबत हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. तर विभागाने या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करताना दक्षतेचा इशाराही दिला आहे

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी गूड न्यूज आहे. जवळपास जून महिना कोरडा गेल्यानंतर आता वरूण राजा जबरदस्त बँटींग करणार आहे. याबाबत हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. तर विभागाने या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करताना दक्षतेचा इशाराही दिला आहे. तर या सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Published on: Jun 28, 2023 11:18 AM