इर्शाळवाडीच्या 43 दुर्घटनाग्रस्त कुटूंबियांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलवलं; दुर्घटनाग्रस्त लोकांना मदतीचा हात

इर्शाळवाडीच्या 43 दुर्घटनाग्रस्त कुटूंबियांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलवलं; दुर्घटनाग्रस्त लोकांना मदतीचा हात

| Updated on: Jul 24, 2023 | 9:00 AM

याचदरम्यान आता चौथ्या दिवशी बचावकार्य थांबवण्यात आल्याचं माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी देताना इर्शाळवाडी येथे तात्पुरत्या निवारा केंद्र उभारण्यात आल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर घटनास्थळी तसेच निवारा केंद्रात जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

रायगड, 24 जुलै 2023 | जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी दरड कोसळून आतापर्यंत 27 जणांच्या मृत्यू झाला आहे. तर अंदाजे 78 जण अजूनही बेपत्ता आहेत. याचदरम्यान आता चौथ्या दिवशी बचावकार्य थांबवण्यात आल्याचं माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी देताना इर्शाळवाडी येथे तात्पुरत्या निवारा केंद्र उभारण्यात आल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर घटनास्थळी तसेच निवारा केंद्रात जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. त्यानंतर आता इर्शाळवाडीच्या 43 दुर्घटनाग्रस्त कुटूंबियांना तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्रात दाखल केलं जात आहे. येथे 50 कंटेनरमध्ये 43 कुटुंबांचं पुनर्वसन होणारेय. मात्र याच्या आधी येथे कोणत्याही सुविधा अजून ही उपलब्ध झाल्या नसल्याचे दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे म्हणणे आहे. तर शासनाने योग्य त्या सोयी सुविधा पाणी बीज द्यावी अशी मागणी इशाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त लोकांनी केली आहे. तर यावेळी पुनर्वसन होणाऱ्या 43 कुटुंबांना तीन महिन्यांचं रेशन शासनाने दिलं आहे. तर, आम्ही इथे राजकारण करायसाठी आलेलो नाही, पालकमंत्री म्हणून मी आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः जातीने लक्ष देत आहोत असेही सामंत यांनी म्हणाले होते.

Published on: Jul 24, 2023 09:00 AM