चंद्रपूरमधील शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना भोलानाथ पावला? अतिवृष्टीमुळे शाळा-महाविद्यालयांना कुलूप
अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आल्याचे दिसत आहे. तर पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून मुंबई, पुण्यात पावसाची संततधार पाहायला मिळेल.
चंद्रपूर, 19 जुलै 2023 | सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आल्याचे दिसत आहे. तर पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून मुंबई, पुण्यात पावसाची संततधार पाहायला मिळेल. याचदरम्यान मात्र विदर्भातही पावसाने जोर लागला आहे. गेल्या दोन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. तर अतिवृष्टीमुळे चंद्रपूरमधील शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यावेळी अतिवृष्टीमुळे 19 जुलैला जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालय बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. तर हा आदेश देताना, भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोणताही अनुचित घटना घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.