विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वृद्ध, अपंग, अंध भाविकांची परवड? समितीचा भोंगळ कारभार? इ रिक्षा वापराविना पडून
वृद्ध, अपंग, अंध, भाविकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. याच गोष्टी लक्षात घेऊन ॲड. माधवी निगडी फाउंडेशन व वेनू सोपान गायकवाड फाऊंडेशनच्या वतीने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, अपंग, अंध, भाविकाच्या सेवेसाठी दहा लाख रुपये खर्च करून दोन इ रिक्षा मंदिर समितीला देण्यात आल्या होत्या.
पंढरपूर : येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे राज्यातील लाखो वारकरी संप्रदायाचं हक्काचं स्थान आहे. येथे हजारो लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यात वृद्ध, अपंग, अंध, भाविकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. याच गोष्टी लक्षात घेऊन ॲड. माधवी निगडी फाउंडेशन व वेनू सोपान गायकवाड फाऊंडेशनच्या वतीने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, अपंग, अंध, भाविकाच्या सेवेसाठी दहा लाख रुपये खर्च करून दोन इ रिक्षा मंदिर समितीला देण्यात आल्या होत्या. मात्र या इ रिक्षा आज वापराविना धूळखात पडल्या आहे. यामुळे मंदिर समितीच्या अशा कारभारामुळे भाविकामधून नाराजगी व्यक्त होत आहे.
Published on: Jun 06, 2023 02:22 PM
Latest Videos