सदानंद कदम यांची कोठडी मागताना ईडीची कोर्टात माहिती

सदानंद कदम यांची कोठडी मागताना ईडीची कोर्टात माहिती

| Updated on: Mar 11, 2023 | 3:13 PM

सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे

मुंबई : दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना न्यायालयात हजर करत ईडीने कोठडीची मागणी केली आहे. त्याचबरोबर सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे. तसेत ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रूपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. तर सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचेही ईडीने म्हटलं आहे.