विनायक मेटेंच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा
मेटेंच्याआठवणी सांगत त्यांच्या आईने हंबरडा फोडला.त्याच्या अचानक जाण्याच्या धक्का पचवणे कुटुंबियांसाठी अवघड जात आहे. याबरोबरच शिवसंग्राम संघटनेचे हजारो कार्यकर्तेही शोक सागरात बुडाले आहेत.
बीड- शिवसंग्राम नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनाची बातमी ऐकताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी मेटे यांच्या घरी धाव घेतली आहे. विनायक मेटे यांच्या आईला घटनेची माहिती मिळताच अश्रू अनावर झाले आहेत. मेटेंच्या आठवणी सांगत त्यांच्या आईने हंबरडा फोडला.त्याच्या अचानक जाण्याच्या धक्का पचवणे कुटुंबियांसाठी(Family)अवघड जात आहे. याबरोबरच शिवसंग्राम (Shivsangram) संघटनेचे हजारो कार्यकर्तेही शोक सागरात बुडाले आहेत. अनेकांना अश्रू अनावर झाले असून बीड मधील त्यांच्या कार्यालयातही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
Published on: Aug 14, 2022 03:51 PM
Latest Videos