10th Board Exam 2021| 10वीच्या परीक्षेबाबत अंतिम निकाल गुरुवारी
मुंबई हायकोर्टाचे (Bombay High Court) मुख्य न्यायधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी कुलकर्णी यांच्या समोरील आजची सुनावणी संपली आहे. (The final result of the 10th exam will be on Thursday)
मुंबई: केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं देखील दहावीच्या परीक्षा रद्द (Maharashtra SSC Exam) करण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) या निर्णयास पुणे येथील निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी (Dhananjay Kulkarni) यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिलं. राज्य सरकारचा दहावी परीक्षेबाबतचा निर्णय रद्द ठरवावा, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई हायकोर्टाचे (Bombay High Court) मुख्य न्यायधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी कुलकर्णी यांच्या समोरील आजची सुनावणी संपली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार म्हणजेच 3 जून रोजी होणार आहे.
Latest Videos