घटस्फोट न देता दुसरे लग्न करणाऱ्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने शिकवला धडा; भर लग्न मंडपात काय झालं पाहा
अनेक वेळा लग्न सुरू असतानाच लग्न थांबल्याचे किंवा त्यात काहीतरी विघ्न आल्याचे अनेकांना माहित असेल. पण जर विघ्न बनून आलेली पहिली बायकोच असेल तर? असाच किस्सा आपल्या राज्यातच झाला आहे...
अहमदनगर : 23 ऑगस्ट 2023 | एक पत्नी असताना घटस्फोट न देता दुसरं लग्न करता येत नाही. मात्र असेही प्रकार होत असतात का? जेथे घटस्फोट न देता नवरदेव हा बोहल्यावर चढू शकतो का? नक्कीच नाही. पण आपल्या राज्यातील एका जिल्ह्यात झाल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे नवदेवावर पोलिसां गुन्हा दाखल झाला आहे. तर लग्नासाठी गुडघ्याला बांशिंग बांधलेल्या नवरदेवाला लग्नमंडपातच पहिल्या पत्नीने चांगलाच धढा शिकवला आहे. ही घटना अहमदनगर येथे घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका तीस वर्षीय महिलेला कळले की आपला पती अहमदनगर येथे जाऊन दुसरे लग्न थाटामाटात करत आहे. ही माहिती कळल्यानंतर पत्नीने आपल्या आई-वडिलांसह आणि इतर नातेवाईकांसह नगर गाठले. नगरमध्ये आल्यानंतर मंगल कार्यालयाचा पत्ता शोधून ती पत्नी बरोबर लग्न लागायच्या आधी काही मिनिटे आपल्या पती समोरच पोहचली. आणि लग्नात चांगलाच राडा झाला. पहिल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या नियोजित वधूला चांगलाच चोप दिला. अचानक झालेल्या या प्रकाराने नवीन वधू, वर, जमलेली व्हराडी मंडळींना सुद्धा काय झाले हे समजले नाही. यावेळी पोलिस तेथे आल्याने सगळे पोहचले तोफखाणा पोलीस स्टेशनमध्ये आणि विशाल पवार याच्यावर पहिल्या पत्नीने गुन्हा दाखल केला.