Eknath Shinde : गौप्यस्फोट 2014 चा, पण राजकीयदृष्ट्या महत्वाचा..! उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री?

| Updated on: Sep 25, 2022 | 5:22 PM

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. यापूर्वी भाजप नेते अमित शाह आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरुन बंद दाराआड काय चर्चा झाली याबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला होता.

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. यापूर्वी भाजप नेते अमित शाह आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरुन बंद दाराआड काय चर्चा झाली याबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला होता. आता 2014 च्या निवडणुकीनंतरचा (Election) किस्सा असला तरी तो राजकीयदृष्ट्या महत्वाचा आहे. 2014 मध्ये भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देऊ केले होते. पण ते पद मला द्यावे लागेल त्यामुळेच कदाचित ते घेतले गेले नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. म्हणजे 2014 पासूनच आपल्या नावाला विरोध केला जात होता, असाच सूर मुख्यमंत्र्यांचा होता. शिवाय याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सांगू शकतील असेही ते म्हणाले आहेत.

Published on: Sep 25, 2022 05:22 PM