Chitra Wagh on Governor | राज्यापालाचं वक्तव्य वेगळ्या अर्थानं घेतलं, चित्रा वाघ यांचं अप्रत्यक्षरित्या राज्यपालांना समर्थन
Chitra Wagh on Governor | राज्यपालाचं वक्तव्य वेगळ्या अर्थानं घेतलं, काय म्हणाल्या चित्रा वाघ
Chitra Wagh on Governor | राज्यपालांचं (Governor) वक्तव्य वेगळ्या पद्धतीत आहे. त्यांचं वक्तव्य वेगळ्या अर्थानं असल्याचे स्पष्ट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वक्तव्याला एकप्रकारे समर्थन केले आहे. मुंबईत राहणारा प्रत्येक जण हा मुंबईकर (Mumbaikar)आहे. मुंबईत अनेक जण वाढले. मोठे झाले, ते मुंबईकर म्हणून. या मुंबईला, महाराष्ट्राला घडवण्यात सर्वांचाच तितकाच समावेश आहे. सगळ्यांचं योगदान आहे, अशा प्रकारची भूमिका राज्यपालांनी मांडल्याचे त्यांनी सांगितले. आज प्रत्येक पक्षात गुप्ता, वर्मा, शर्मा आहेतच आणि हे सर्वच जण आज मराठी म्हणूनच वावरतात. त्यामुळे ते मुंबईकर ,महाराष्ट्रीयन झाले आहेत. विरोधकांकडे (Opposition Leader) आता दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नसल्याने ते नाहक टीका करत असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप ही त्यांनी केला. तसेच शिवीगाळ करणाऱ्यांविरोधात कोणाचीच जीभ रेटत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.