ऐतिहासिक रामसेतूवर पडणार हातोडा, अस्मितेसाठी नाशिककर एकवटले

ऐतिहासिक रामसेतूवर पडणार हातोडा, अस्मितेसाठी नाशिककर एकवटले

| Updated on: Feb 13, 2022 | 1:06 PM

नाशिकमध्ये (Nashik) स्मार्ट सिटीच्या (Smart City) कारभारामुळे शहर खरेच स्मार्ट होतेय का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलीय.

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) स्मार्ट सिटीच्या (Smart City) कारभारामुळे शहर खरेच स्मार्ट होतेय का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलीय. त्याला कारणही तसेच आहे. कारण या कामासाठी ऐतिहासिक (historic) रामसेतू पूल पाडण्यात येणार असल्याचे समजते. या विरोधात जनआंदोलन उभे राहताना दिसत असून, नागरिकांनी पुढे येत या उफराट्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. शिवाय काही हालचाली केल्या, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने या कामासाठी एकूण 294 कोटींचा निधी दिला होता. त्यापैकी तब्बल 205 कोटी रुपये पडून आहेत. मग नेमके स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात काय सुरू आहे, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. नाशिक महापालिकेची निवडणूक जवळ आलीय. त्यामुळे आता या विषयावरून राजकारण पेटण्याची शक्यताय.

Published on: Feb 13, 2022 01:06 PM