राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित रोहित पवार यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; ‘त्या’ गुन्ह्याला स्थगिती
बारामती ॲग्रो साखर कारखान्याविरोधात भाजप नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी गाळप हंगामाच्या आधी कारखाना सुरू केल्याचा दावा करताना चौकशी मागणी केली होती. तर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत चौकशीनंतर कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
पुणे, 26 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर बारामती ॲग्रो साखर कारखान्याविरोधात भाजप नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी गाळप हंगामाच्या आधी कारखाना सुरू केल्याचा दावा करताना चौकशी मागणी केली होती. तर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत चौकशीनंतर कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर बारामती ॲग्रोवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. असा गुन्हा दाखल झाल्याने रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात होता. मात्र आता याप्रकरणी मोठी माहिती समोर येत असून रोहित पवार यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तर बारामती ॲग्रोवर दाखल गुन्ह्याला स्थिगिती दिली आहे. त्याचबरोबर यानंतर पुढील कारवाईस देखील उच्च न्यायालयाने स्थिगिती दिली आहे. त्यामुळे आता हा निर्णय रोहित पवार यांना दिलासा देणारा असून तो भाजप नेते आमदार राम शिंदे यांना धक्का देणार आहे.