ऐतिहासिक भिडे वाडा कि दारूचा अड्डा ? भिडे वाड्याची दुरावस्था…
दारूच्या बाटल्या , वेफर्सची पाकिटे, सिगारेटची थोटके अशा वस्तूंचा खच वाड्यात पाहायला मिळत आहे. हे कमी की काय अक्षरश: बिछानाही याठिकाणी दिसून आला आहे. तर दोरीवर वाळत घातलेले कपडेही निदर्शनास आले आहेत.
पुणे : देशातील पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाड्याची (Pune Bhide wada) दिवसेंदिवस अतिशय दुरावस्था होऊ लागली आहे. मुलींची पहिली शाळा म्हणजेच पुण्यातील भिडे वाडा सध्या दारूचा अड्डा बनवला आहे. इथे पाहणी केल्यानंतर अनेक धक्कादायक आणि संतापजनक बाबी उघडकीस आल्या आहेत. दारूच्या बाटल्या (Liquor bottles), वेफर्सची पाकिटे, सिगारेटची थोटके अशा वस्तूंचा खच वाड्यात पाहायला मिळत आहे. हे कमी की काय अक्षरश: बिछानाही याठिकाणी दिसून आला आहे. तर दोरीवर वाळत घातलेले कपडेही निदर्शनास आले आहेत. त्यामुळे शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारा हा का तो ऐतिहासिक (Historical) भिडे वाडा, असा सवाल आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. पुणे महानगरपालिकेचेदेखील याकडे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा याकडे लक्ष देण्याची इतिहासप्रेमी मागणी करत आहेत.