Girish Mahajan : याकूब मेमनच्या कबरीवर रोषणाई ही दुर्देवी बाब, महाजनांचा निशाणा कुणावर?
याकूब मेमनसारख्या देशद्रोहाच्या कबरीवर रोषणाई ही दुर्देवी गोष्ट असल्याचे भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. शिवाय याची चौकशी करुन संबंधितावर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सध्या या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप होत असले तरी चौकशीअंतीच काय ते समोर येणार आहे.
जळगाव : (Yakub Memon) याकूब मेमनच्या कबरीवर विद्युत रोषणाई कुणी केली यावरुन राज्याचे (Politics) राजकारण तापले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहे. याबाबत चौकशीचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. असे असतानाही भाजपाकडून मात्र, महाविकास आघाडीला लक्ष केले जात आहे. याकूब मेमनसारख्या देशद्रोहाच्या कबरीवर रोषणाई ही दुर्देवी गोष्ट असल्या(Girish Mahajan) चे भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. शिवाय याची चौकशी करुन संबंधितावर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सध्या या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप होत असले तरी चौकशीअंतीच काय ते समोर येणार आहे.
Published on: Sep 09, 2022 08:05 PM
Latest Videos