गुड न्यूज | मान्सूनच्या प्रगतीत कोणताही अडथळा नाही; ”या’ तारखे”ला बरसतील सरी
रेंगाळलेला मान्सून आता पुन्हा सक्रीय झाल्याचे सांगत 8 ते 10 जूनपर्यंत मुंबई, कोकणात पाऊस पडेलं असा अंदाज वर्तवला आहे. तर येत्या 2-3 दिवसातच मान्सून केरळात पोहोचेल, अशी चिन्हे दिसत आहेत
मुंबई : राज्यातील उकाड्याने हैराण झालेले तर पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी भारतीय हवामान खात्यानं एक गुड न्यूज दिली आहे. त्यांनी रेंगाळलेला मान्सून आता पुन्हा सक्रीय झाल्याचे सांगत 8 ते 10 जूनपर्यंत मुंबई, कोकणात पाऊस पडेलं असा अंदाज वर्तवला आहे. तर येत्या 2-3 दिवसातच मान्सून केरळात पोहोचेल, अशी चिन्हे दिसत असल्याचे सांगताना टप्प्याटप्प्याने मान्सूनची देशभरात आगेकूच होईल असेही म्हटलं आहे. 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे. याबाबत भारतीय हवामान खात्याचे के. एस. हसाळीकर यांनी ट्विट करत, मान्सून येत्या 2,3 दिवसात मालदीव बेटे, कमोरीयन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व द अरबी समुद्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकुल परिस्थिती असल्याची माहिती दिली होती.
Published on: Jun 01, 2023 11:05 AM
Latest Videos