Biparjoy Cyclone : मच्छीमारांसाठी मोठी अपडेट!; खोल समुद्रात जाऊ नका? का दिले निर्देश?

Biparjoy Cyclone : मच्छीमारांसाठी मोठी अपडेट!; खोल समुद्रात जाऊ नका? का दिले निर्देश?

| Updated on: Jun 09, 2023 | 7:34 PM

पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र असं बिपरजॉय चक्रीवादळ सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 820 किलोमीटर, मुंबईपासून 850 किलोमीटर तर पोरबंदरपासून 850 किलोमीटर अतंरावर घोंगावत आहे.

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट आली आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र असं बिपरजॉय चक्रीवादळ सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 820 किलोमीटर, मुंबईपासून 850 किलोमीटर तर पोरबंदरपासून 850 किलोमीटर अतंरावर घोंगावत आहे. तर पुढील 36 तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तर हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यावर धकडकणार आहे. सध्या मुंबईच्या समुद्राला उधाण आलं असून उंच लाटा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर उसळत आहे. त्यामुळं अरबी समुद्रात खोलवर जाऊन मच्छीमारानी मासेमारी करू नये असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

Published on: Jun 09, 2023 07:34 PM