Special Report | 'The Kerala Story' चित्रपटावरुन महाराष्ट्रात राजकीय वादाची ठिणगी; भाजप आणि विरोधक आमने सामने

Special Report | ‘The Kerala Story’ चित्रपटावरुन महाराष्ट्रात राजकीय वादाची ठिणगी; भाजप आणि विरोधक आमने सामने

| Updated on: May 10, 2023 | 7:07 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द केरळ स्टोरी चित्रपटावरून हा चित्रपट दहशतवादी कारस्थानांवर बनवण्यात आला आहे. तर काँग्रेसने नेहमीच व्होट बँकेसाठी दहशतवादाचा बचाव केला आहे अशी टीका केली होती.

मुंबई : The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. पण या चित्रपटावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. भाजपने चित्रपटाला समर्थन दिलं आहे. तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसने विरोध केला आहे. कर्नाटक निवडणुकीत तर हा चित्रपट म्हणजे प्रचाराचं साधणं ठरलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द केरळ स्टोरी चित्रपटावरून हा चित्रपट दहशतवादी कारस्थानांवर बनवण्यात आला आहे. तर काँग्रेसने नेहमीच व्होट बँकेसाठी दहशतवादाचा बचाव केला आहे अशी टीका केली होती. त्यावरून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी याच मुद्द्यांवरून मोदींवर हल्लाबोल केला आहे. आता राज्यातही यावरून जोरदार राजकारण रंगलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपवर टीका केली आहे. तर ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सर्वाजनिकरित्या फासावर लटकवले पाहिजे असे ट्वीट शेअर टीका केली. तर निवडणुका येताच अशी एक फाईल का बाहेर येते? असा सवाल केला आहे. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. त्यांनी आव्हाडांना त्यांच्या मतदारसंघात निवडून यावं लागतं म्हणून असं बोलतात. तर ते असे नाही बोलले तर ते मुंब्रा येथून जिंकूच शकत नाही अशी टीका केली आहे. तर देशभरात चित्रपटाची चर्चा सुरू असलीतरिही राज्यात मात्र राजकीय घमासान सुरू आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 10, 2023 07:07 AM