यमदुताने खोटं बोलण्यासाठी काही लोकांची नियुक्ती केली; राऊतही यांच्यातीलच एक, भाजप नेत्याची सडकून टीका
मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 40 हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती असून याला कोण जबाबदार? असा सवाल सामना अग्रलेखातून करताना केंद्रावर टीका करण्यात आली होती.
नांदेड : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू असून तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. तर भाजपकडून हा प्रोपागंडा चालवण्यात येत असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. पण मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 40 हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती असून याला कोण जबाबदार? असा सवाल सामना अग्रलेखातून करताना केंद्रावर टीका करण्यात आली होती. ही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. सामनाच काय करावं हेच मला कळतं नाही. यमदुताने आणि परमेश्वरानं जसं खोटं बोलण्यासाठी काही लोकांची नियुक्ती केली आहे. त्यात सामानातील काही लोकं आहेत. तर संजय राऊत यांची नियुक्तीच त्यासाठी करण्यात आल्याचा घणाघात केला आहे. आमच्या सोबत होते तेव्हा गुजरात मॉडेलवर अग्रलेख लिहले जायचे. मात्र आता विरोध केला जात आहे अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.