केरळ सरकारच्या टीकेनंतर ठाकरे गटाचा ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून भाजपवर वार; राऊत म्हणाले, भाजपचा प्रोपगंडा
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचं आणि त्यात दाखवलेल्या घटनांचं समर्थन मोदी यांनी केलं आहे. त्यावरून त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपसह पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपचा प्रोपगंडा असणारा चित्रपट म्हटलं होतं. तर काँग्रेसकडूनही टीका केली गेली आहे. याच्याआधी ‘द काश्मीर फाइल्स’चं कौतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानंतर आता ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचं आणि त्यात दाखवलेल्या घटनांचं समर्थन मोदी यांनी केलं आहे. त्यावरून त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपसह पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी, ‘द केरला स्टोरी’ चित्रपट भाजपच्या प्रचाराचा एक भाग आहे. जेव्हा निवडणुका जवळ येतात त्यावेळी अशा पद्धतीचे चित्रपट तयार केले जातात. तर चित्रपट हा एक प्रपोगंडा चित्रपट आहे. तर हिंदू मुस्लिम हा एक महत्त्वाचा मुद्दा असून त्याशिवाय भाजप निवडणुकीला समोर जाऊ शकत नाहीत. तर मोदी यांनी प्रचार सभेत, काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्या लोकांशी मागल्या दाराने राजकीय सौदेबाजी देखील करत आहे. म्हणूनच कर्नाटकमधील लोकांनी या काँग्रेसपासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक चित्रपटावर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काँग्रेसला असं काही करताना पाहतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं, असे म्हणाले होते.