Raosaheb Danve : राजाची निवड आता पेटीतून, दानवेंचे टीकास्त्र कुणावर..!
उद्धव ठाकरे यांनी (MVA) राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसबरोबर युती केली. यावरुन विरोधक टीकेची एकही संधी सोडत नाहीत. दानवे यांनी हे वेगळ्या पद्धतीने सांगितले आहे. बाळासाहेबांचे विचार हे हिंदूत्वाचे होते. पण सत्तेसाठी आपल्या विचारांना उद्धव ठाकरे यांनी बाजूला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबई : पूर्वीच्या काळी राजाच्या पोटी राजाच जन्माला येत होता. मग तो कसा का असेना तो पुढे चालून राजाच होत होता. मात्र, आता तसे राहिलेले नाही राजा कोण हे जनता ठरवते. मताधिक्यावर ते ठरते. पण (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत पण आपल्या विचारांना तिलांजली देऊन ते राजकीय वारसदार राहिले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर जो तो प्रश्न उपस्थित करीत आहे. उद्धव ठाकरे यांनी (MVA) राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसबरोबर युती केली. यावरुन विरोधक टीकेची एकही संधी सोडत नाहीत. (Raosaheb Danve) दानवे यांनी हे वेगळ्या पद्धतीने सांगितले आहे. बाळासाहेबांचे विचार हे हिंदूत्वाचे होते. पण सत्तेसाठी आपल्या विचारांना उद्धव ठाकरे यांनी बाजूला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या विचारावर ठाम राहिले असते तर आजचे चित्र हे वेगळे असते असेही दानवे म्हणाले आहेत.