‘खासगी दुध संघानी शेतकऱ्यांवर दरोडाच घातलाय’; सदाभाऊ खोत यांचा खासगी दुध संघाना इशारा

‘खासगी दुध संघानी शेतकऱ्यांवर दरोडाच घातलाय’; सदाभाऊ खोत यांचा खासगी दुध संघाना इशारा

| Updated on: Jul 23, 2023 | 7:55 AM

मात्र काही खासगी दूध संघांकडून मनमानी कारभार उघड झाला आहे. ज्यामुळे शेतकऱ्याचे आणि दुध उत्पादकाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. यावरून शेतकरी संगटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवरच हल्लाबोल करताना टीका केली होती.

सांगली | 23 जुलै 2023 : राज्य सरकारने गाईच्या दुधाला 3/5 फॅट आणि 8/5 SNF ला 34 रुपये एवढा दर निश्चित केला. त्याप्रमाणे दरपत्रक देखील जाहीर केलं आहे. मात्र काही खासगी दूध संघांकडून मनमानी कारभार उघड झाला आहे. ज्यामुळे शेतकऱ्याचे आणि दुध उत्पादकाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. यावरून शेतकरी संगटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवरच हल्लाबोल करताना टीका केली होती. त्यानंतर आता याचमुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी थेट आता खासगी दूध संघांना इशारा दिला आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारने गाईच्या दुधाला 3/5 फॅट आणि 8/5 SNF ला 34 रुपये एवढा दर निश्चित केला. त्याप्रमाणे दरपत्रक देखील जाहीर केलं आहे. परंतु काही खासगी दूध संघ हे शेतकऱ्याची लूट करत आहेत. राज्यातील काही खासगी दुध संघानी शेतकऱ्यांवर दरोडाच घातल्याचा आरोप केला आहे. तर यासंदर्भात तात्काळ दुग्धविकास मंत्री यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडणार असेही त्यांनी सांगितलं आहे. याचबरोबर अशा पांढऱ्या दुधातील या काळ्या बोक्यांना आता चाफ बसावल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, असा इशारा देखील खोत यांनी दिला आहे.

Published on: Jul 23, 2023 07:55 AM