Ajit Pawar | मग तुम्ही मुख्यमंत्री थेट जनतेतून निवडा, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांना गुगली, लोकशाहीतील परंपरांची करुन दिली आठवण

Ajit Pawar | मग तुम्ही मुख्यमंत्री थेट जनतेतून निवडा, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांना गुगली, लोकशाहीतील परंपरांची करुन दिली आठवण

| Updated on: Jul 16, 2022 | 4:52 PM

Ajit Pawar on CM : नगराध्यक्ष, गावाचा सरपंच जनतेतून थेट निवडत आहेत तर मुख्यमंत्रीही जनतेतून थेट निवडा अशी गुगली राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टाकली

Ajit Pawar News : राज्य सरकारने नगराध्यक्ष (Mayor)आणि गावचा सरपंच (Village Sarpanch) थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय (directly elected by the people) घेतला आहे. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते (leader of the opposition) अजित पवार यांची माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली. त्यावर नगराध्यक्ष, सरपंच नाही तर पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्षच नव्हे तर राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाच्या राष्ट्रपतींचीही थेट जनेततून निवड करण्याचा टोला पवार यांनी हाणला. निर्णय घेताना लोकशाही परंपरा पाळाव्या लागतात याची आठवण त्यांनी करुन दिली. 1962 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडणुकीचा पायंडा पडला आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री जसे निवडल्या जातात. तसेच सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड होणे हितकारक आहे. कारण गेल्यावेळी ही हा निर्णय झाला तेव्हा सरपंच एका विचाराचा आणि सदस्य एका विचाराचे अशी तफावत महाराष्ट्राने अनुभवल्याचे त्यांनी सांगितले.एकाच व्यक्तीच्या हातात सत्ता केंद्रीत होते आणि ही गोष्ट लोकशाहीला घातक असल्याचा इशारा त्यांनी दिला.

निवडणुकींचा खर्चाचा बोजा कशाला?

बाजार समित्यांमध्ये (Market Committee) शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय चांगला असला तरी बाजार समित्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खर्च येणार आहे. याचा बोजा बाजार समित्यांवर आणि पर्यायाने शेतक-यांवरच पडणार असल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.