ठाकरे घराण्यातील या नेत्याचं जंगी स्वागत, कंदी पेढ्यांचा हार, फटाक्यांची आतषबाजी आणि...

ठाकरे घराण्यातील या नेत्याचं जंगी स्वागत, कंदी पेढ्यांचा हार, फटाक्यांची आतषबाजी आणि…

| Updated on: Jan 29, 2023 | 10:56 AM

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यानंतर आता आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे हे ही राजकारणात सक्रिय झाले आहे.

सातारा : प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून चालत आलेला ठाकरे घराण्याचा वारसा आता त्या घराण्यातील युवकांपर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यानंतर आता आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे हे ही राजकारणात सक्रिय झाले आहे.

अमित आणि आदित्य यांचे राज्यभरात अनेक चाहते आहेत. सत्ता बदलानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यात शिवसंपर्क अभियान सुरु केले होते. तर, मनसे नेते अमित राज ठाकरे यांचे महासंपर्क अभियान राज्यात सुरु आहे. यानिमित्त अमित ठाकरे सातारा येथे आले असता फटाक्यांची आतषबाजी करत आणि साताऱ्यातील प्रसिद्ध अशा कंदी पेढ्यांचा हार घालत मनसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. तर महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केलं.

Published on: Jan 29, 2023 10:56 AM