रात्रीचे प्रेम वाढवा, निवडणूक जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा अनोखा सल्ला

रात्रीचे प्रेम वाढवा, निवडणूक जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा अनोखा सल्ला

| Updated on: Jan 15, 2023 | 5:23 PM

येणाऱ्या काळात निवडणुकांची रांग लागणार आहे. पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगर परिषद या निवडणूक जिंकण्यासाठी सर्वानी मदत करायची आहे. त्यासाठी रात्रीचे प्रेम वाढवा...

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे तेथे भाजपला यश मिळालं. विरोधकांनी शंका उपस्थित केल्या. पण, आपणच जास्त ग्रामपंचायती जिंकल्या. निवडणूक जिंकल्यानंतर एकत्र आले पाहिजे. कार्यकर्त्याला बळ मिळायला हवं, असं विधान राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील ( CHANDRAKANT PATIL ) यांनी केलंय.

ग्रामपंचायतीच्या सरपंचाने आपल्या खिशातील पैसे टाकून एक पीए ठेवावा. सोषलं माध्यमांचं तंत्र शिकून घ्यावं. नगर परिषद, जिल्हा परिषद येथील समित्यांवर कार्यकर्त्यांना नियुक्त करा, असा सल्लाही त्यांनी कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलताना दिला.

पक्षाचा प्रत्येक कार्यक्रम, निवडणूक झाल्यानंतर एकत्र आले पाहिजे. एक रात्र एकमेकांसोबत घालवून गाणी, चुटके सांगायचे. यामुळे प्रेम वाढते, दोस्ती वाढते. आपण मित्र होतो. बांधिलकी निर्माण होते. विरोधकांना दाखविण्यासाठी ते आवश्यक आहे, असा निवडणूक जिकंण्याचा मूलमंत्रही मंत्री पाटील यांनी सांगितला.

Published on: Jan 15, 2023 05:23 PM