तर, मविआ सरकार टिकलं असतं, नाना पटोले यांच्या ‘त्या’ कृतीवरून विजय वडेट्टीवार यांचे मोठे विधान
मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर दिल्लीत पहिल्यांदा आलो. त्यामुळे त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत राज्यातील राजकारणावर चर्चा झाली.
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली. त्यानंतर TV9 मराठीशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले. मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर दिल्लीत पहिल्यांदा आलो. त्यामुळे त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत राज्यातील राजकारणावर चर्चा झाली. मात्र, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत कोणताही चर्चा झाली नाही. त्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे पद रिक्त झाले. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता अशा अनेकांच्या भावना होत्या. नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता आणि अध्यक्ष पद वेळेत भरले गेले असते तर सरकार वाचले असते असे त्यांनी स्पष्ट केले
Published on: Feb 09, 2023 01:03 PM
Latest Videos