इगतपुरीतस मुसळधार पाऊस; भावलीतील मुख्य धबधबा ही झाला प्रवाहित
अनेक भागात जोरदार पाऊस होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत. तर इगतपुरी तालुका आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.
इगतपुरी : मागील काही दिवसांपासून राज्यात रखडलेल्या पावसाने जोरदार एंन्ट्री केली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत. तर इगतपुरी तालुका आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील धबधबे वाहू लागले आहेत. दरम्यान, भावलीतील मुख्य धबधबा ही पहिल्याच पावसात प्रवाहित झाला आहे. शेकडो मीटर उंचीवर असलेल्या या धबधबातील पाणी खाली कोसळत असल्याने हा पर्यटकासाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. धबधब्याचे नयनरम्य दृश्य पर्यटक आपल्या नजरेत सामावून ठेवण्यासाठी येथे जात असतात. इगतपुरीत मान्सून सक्रिय होऊन काही दिवसच झाले असले तरी भावलीचा मुख्य धबधबा हा प्रवाहित झाला असून सध्या त्याने रौद्र रूप धारण केलं आहे.
Published on: Jul 13, 2023 10:36 AM
Latest Videos