फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वात जास्त दिशाभूल केली? कोणी केला थेट आरोप
तर सात वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात लाखोच्या संख्येने मोर्चे काढले मात्र सरकारने फक्त आश्वासनाचे गाजर देत दिशाभूल केली असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केला आहे.
अहमदनगर, 9 ऑगस्ट 2023 । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा क्रांती ठोक मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. यावेळी रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरमधून मुंबईकडे रवाना झाले आहेत. 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्य साधून ते सरकारपुढे मराठा समाजाच्या विविध मागण्या आणि आरक्षणासंदर्भात बोलणार आहेत. मात्र सरकारने मराठा आरक्षणाची दखल न घेतल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरावर काळे झेंडे लावणार असल्याचा इशारा सरकारला दिलाय. तर सात वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात लाखोच्या संख्येने मोर्चे काढले मात्र सरकारने फक्त आश्वासनाचे गाजर देत दिशाभूल केली असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वात जास्त दिशाभूल केल्याचं म्हंटल आहे. उद्या जर मागणी मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा केरे यांनी दिला आहे.