Pandharpur | भक्तीमय वातावरणात पंढरपुरात रंगला विठ्ठल-रखुमाईचा विवाह सोहळा

Pandharpur | भक्तीमय वातावरणात पंढरपुरात रंगला विठ्ठल-रखुमाईचा विवाह सोहळा

| Updated on: Feb 05, 2022 | 1:40 PM

पंढरपुरा(Pandharpur)त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा(Vitthal Rukmini Mandi)मध्ये आज विठू रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. कोरोना(Corona)च्या पाश्वर्भूमीवर या विवाह सोहळ्यासाठी मर्यादित भाविकांनाच परवानगी देण्यात आली होती.

पंढरपुरा(Pandharpur)त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा(Vitthal Rukmini Mandi)मध्ये आज विठू रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. हजारोंच्या संख्येने भाविक या विवाह सोहळ्यासाठी येत असतात, यंदाही गर्दी होती. मात्र कोरोना(Corona)च्या पाश्वर्भूमीवर या विवाह सोहळ्यासाठी मर्यादित भाविकांनाच परवानगी देण्यात आली होती. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर होणाऱ्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या 36 प्रकारच्या सात टन फुलांची आकर्षक अशी सजावट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आलेली आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली आहे. दरवर्षी वसंत पंचमीचे औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा विवाह सोहळा साजरा केला जातो. यानिमित्ताने मंदिर परिसरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय होतं.