‘अजित पवार यांनी पदे सोडून स्वत:च्या नव्या संस्था निर्माण कारव्यात’; सामनाच्या रोखठोकमधून राऊत यांचा टोला

‘अजित पवार यांनी पदे सोडून स्वत:च्या नव्या संस्था निर्माण कारव्यात’; सामनाच्या रोखठोकमधून राऊत यांचा टोला

| Updated on: Aug 20, 2023 | 10:13 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. तर शरद पवार हे पक्ष बांधणीसाठी राज्यभर फिरणार आहेत. तर त्यांनी नाशिक आणि बीड येथे दोन सभा घेत बंडखोरांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. तर अजित पवार हे देखील उत्तर सभा घेणार आहे.

मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पाडली. त्यांनी आपल्यासोबत ३० एक आमदार घेत सत्तेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादी फोटू नये म्हणून अजित पवार यांनी गेल्या ४५ दिवसात चार वेळा भेट घेतली आहे. यातील दोन या थेट घेतल्या होत्या. तर एक काकी यांनी भेटण्यासाठी कौटुंबिक होती. तप एक पुण्यातील उद्योगपतीच्या घरात गुप्त बैठक झाली. याच गुप्त बैठकिवरून सध्या संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या भेटींवरून सामनाच्या ‘रोखठोक’मध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अंदाज बांधला आहे. तसेच थेट अजित पवार यांच्यावर टीका देखील करण्यात आली आहे. सामनाच्या ‘रोखठोक’मधून अजित पवार हे नक्कीच बलवान नेते आहेत. पण त्यांच्यामागे सत्ता आणि शरद पवार हे नाव नसेल तर त्यांना कोण विचारतं असा सवाल केला आहे. तर ज्यांनी त्यांना या राजकारणाच्या शिखरावर बसवलं त्याच शरद पवारांनाच ढकलण्याचा प्रयत्न अजित पवार करत असल्याची टीका करण्यात आली आहे. तर पवार काका-पुतण्या यांच्यातील या बैठका राजकीय नसून त्या संस्थांच्या भवितव्यावरून होत आहेत असा अंदाज बांधला गोलाय. तर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या संस्थांतून बाहेर पडण्याचं औदार्य दाखवावं आणि स्वत:च्या नव्या संस्था निर्माण कराव्यात असं रोखठोकमधून म्हटलं आहे.

Published on: Aug 20, 2023 10:13 AM