मुलीची घोड्यावरून वरात काढत सांगळे कुटुंबीयांकडून स्त्री पुरूष समानतेचा संदेश
बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील सांगळे कुटुंबियांनी मुलाप्रमाणे आपल्या मुलीच्या लग्नाची घोड्यावरून वरात काढत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिलाय.
बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील सांगळे कुटुंबियांनी मुलाप्रमाणे आपल्या मुलीच्या लग्नाची घोड्यावरून वरात काढत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिलाय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात राहणारे विजय सांगळे हे एका खासगी दुकानात नोकरी करतात, त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत, आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य असलेल्या या दांपत्याला दोन मुली आहेत, परंतु त्यांनी कधीही मुलाची अपेक्षा केली नाही, मुलांप्रमाणेच मुलींवर संस्कार टाकून त्यांचे शिक्षण केले, आणि आता त्यांच्या मोठ्या मुलीचे आज 26 मार्च रोजी बुलडाणा येथील भास्कर उर्फ धनराज राऊत यांच्याशी विवाह होत आहे, त्यापूर्वीच 24 मार्च रोजी रात्री या दाम्पत्याने मुला प्रमाणे घोड्यावरून आपल्या मुलीची वरात काढली आहे. या वरातीचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पुरुषांप्रमाणेच महिला फेटे बांधून डिजेवर चांगल्याच थीरकातांना पाहायला मिळाल्या, आणि या वरातीत 90 टक्के महिलाच (Womens) सहभागी होत्या.