महाराष्ट्रात धुवाँधार, रत्नागिरी जिल्ह्यातही कोसळधारा!; हवामान विभागाचा 'रेड अलर्ट'

महाराष्ट्रात धुवाँधार, रत्नागिरी जिल्ह्यातही कोसळधारा!; हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’

| Updated on: Jul 27, 2023 | 9:17 AM

याच दरम्यान काल (दि.२६) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, गडचिरोली या सात जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई | 26 जुलै 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, गडचिरोली येथील नद्यांनी आपले पात्र ओलांडले आहे. तर नद्यांचे पाणी रहिवाशी भागात आणि शेतशिवारात घुसले आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी शेतीसह आर्थिक नुसकान झाले आहे. याच दरम्यान काल (दि.२६) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, गडचिरोली या सात जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा, विद्यालयांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. यासंबधिचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले. Ratnagiri Rain Red Alert

Published on: Jul 27, 2023 09:17 AM